सोन्याचा चमचा अन् पानाला चुना: गुलाबराव पाटील रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक, नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माना आल्याची टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ते पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हा देखील सोन्याचा चमचा घेऊन आला असं म्हणायचा का? असा प्रतिसवाल केला. ते फक्त सोन्याचा चमचा आणि पोट्ट्या हे सोडून काहीच बोलत नसल्याची खोचक टीका रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?
रोहित पवार हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले पोरगा आहे. ते इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकलेले आहेत. त्यांना जिल्हा परिषद शाळेचे काय कळतंय अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यांच्या टीकेवर आमदार रोहित पवार यांनी मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो असं ते म्हणाले.मात्र, सोन्याचा चमचा घेऊन कोणी जन्माला येत असेल अथवा पानाला चुना लावत राजकारणामध्ये येत असेल हे चर्चेसारखे विषय नाही.
सध्या परिस्थितीमध्ये धोरणात्मक बोललं पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये काय विकास काम केली ही सर्व तुम्हाला माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर मिळतील, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
मी साधा आमदार आणि पक्षाचा कार्यकर्ता आहे. जर एक साधा आमदार मतदारसंघांमध्ये काय करू शकतो हे दाखवून दिले आहे. तर तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात त्यामुळे त्या कॅबिनेट मंत्रीपदाचा वापर करा आणि लोकांना दाखवून द्या परिवरर्तन करून दाखवा, असे थेट आव्हान रोहित पवार यांनी गुलाबराव पाटील यांना दिले.