ग्लोबल मार्केटच्या दृष्टीने विचार केल्यास उद्योजकांना अनेक संधी – विनोद जाधव
शिक्षण विश्व; सावा हेल्थकेअरचे विनोद जाधव यांना पीसीईटी कडून लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड
![If you think in terms of global market, there are many opportunities for entrepreneurs - Vinod Jadhav](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Glonal-Market-780x470.jpg)
पिंपरी : ” शिक्षण आणि जिज्ञासा ही सदासर्वकाळ माणसाच्या सोबत असते. आपण जिथे शिक्षण घेतो अथवा काम करतो तिथे आपली जिज्ञासा कायम ठेवली तर , कोणतीही गोष्ट अशक्य नाही . ग्लोबल मार्केटचा विचार करून , जगभरात विविध संधी उद्योजकांची वाट पाहत आहेत , उद्योजकांनी जगभरात उपलब्ध असलेल्या संधींकडे उघड्या डोळयांनी पाहत आपला उत्कर्ष साधून घ्यायला हवा.असे मत सावा हेल्थकेअर , दुबईचे सर्वेसर्वा विनोद जाधव यांनी केले.
हेही वाचा : EVM बद्दल सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस, दिले ‘हे’ नवे निर्देश
ग्लोबल आंत्रप्रेन्योर्स कॉन्क्लेव्ह २०२५ च्या यशोगाथा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या आकुर्डी येथील शैक्षणिक संकुलात ते बोलत होते. एमईडीसीचे उपाध्यक्ष , पीसीयू गवर्निंग बॉडीचे सदस्य आणि ग्लोबल आंत्रप्रेन्योर्स कॉन्क्लेव्ह 2025 चे निमंत्रक सचिन इटकर यांनी विनोद जाधव यांच्याशी अनौपचारिक चर्चेद्वारे खुला संवाद साधला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्लोबल आंत्रप्रेन्योर्स कॉन्क्लेव्ह २०२५ चे अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी प्रास्ताविकात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची यशस्वी वाटचाल मांडली व तसेच नुकत्याच यशस्वीरित्या पार पडलेल्या भव्य ग्लोबल आंत्रप्रेन्योर्स कॉन्क्लेव्ह २०२५ चा आढावा घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून ग्लोबल फार्मसी मार्केट , आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक कायदे यांच्याबद्दल जाणून घेतले.
या परिषदेसाठी पोर्टफोलिओचे माजी संचालक
डॉ. मकरंद जावडेकर यांनी जगभरातील फार्मसी सेक्टर , औषधे विपणन याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. मकरंद जावडेकर यांच्या हस्ते विनोद जाधव यांना पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड प्रदान करण्यात आला. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे , अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई उपस्थित होते.