जागतिक व्यापारी आणि भूराजकीय घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी उसळी
भारत-अमेरिकेतील दुरावलेले संबंध आणि इतर घडामोडींमुळे मौल्यवान धातूत मोठी वाढ

मुंबई : जागतिक व्यापार आणि भूराजकीय तणावामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत उसळी दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यातही ही किंमतीतील उसळी दिसून आली. वायदे बाजारात(MCX) सोन्याची किंमत जवळपास 4 हजार रुपयांनी वधारले. सोन्याच्या किंमतीत 3,887 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी दिसली. तर चांदीत 2,824 रुपये प्रति किलोने वाढ दिसली. स्थानिक सराफा बाजारातही या आठवड्यात दोन्ही धातुनी मुसंडी मारली. काय आहेत आता किंमती?
सोन्यात आले तुफान
आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने चार दिवसात 2100 रुपयांची मुसंडी मारली होती. 4 सप्टेंबर रोजी किंमतीत थोडीपार घसरण दिसून आली. तर 5 सप्टेंबर रोजी 760 रुपयांनी किंमती वधारल्या. त्यानंतर सोने 850 रुपयांनी महागले. दिवाळीत सोन्याचा भाव 1 लाख 25 हजारांच्या घरात जाण्याची शक्यता पण व्यक्त होत आहे. गुडरिटर्न्सनुसार, सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,08,620 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 99,600 रुपये इतका आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
चांदीला लागली धाप
गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला चार दिवसात चांदी 2100 रुपयांनी वधारली. 4 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेचा निर्णय समोर आला. त्यादिवशी चांदीत बदल दिसला नाही. तर 5 सप्टेंबर रोजी चांदी एक हजारांनी घसरली. आज सकाळच्या सत्रात चांदीच्या किंमतीत कोणताही बदल दिसला नाही. एका किलोचा भाव 1,28,000 रुपयांवर पोहचली आहे. दिवाळीपर्यंत चांदी पण मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीत घसरण दिसून येत आहे. 24 कॅरेट सोने 1,06,340 रुपये, 23 कॅरेट 1,05,910, 22 कॅरेट सोने 97,410 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 79,750 रुपये, 14 कॅरेट सोने 62,210 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,23,170 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सोने आणि चांदीवरील जीएसटी स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकारने जीएसटी दर कमी केलेले नाही. जीएसटीतून या दोन्ही धातुला वगळण्याची मागणी सातत्याने ग्राहक आणि व्यापारी करत आहेत.