राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यात गिव्ह ईट अप योजना लागू होणार
![Give It Up scheme will be implemented in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Give-It-Up-scheme-780x470.jpg)
मुंबई : राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात गिव्ह ईट अप योजना सुरु होणार आहे. सरकारी योजना किंवा लाभ परत करण्यासाठी प्रथमच हा पर्याय महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत सरकारच्या ६५ योजनांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे.
या योजनेद्वारे आर्थिक सक्षम लोकांना सरकारी लाभ नाकारायचा पर्याय एस्सेल तर यामाध्यमातून नाकारता येईल. कौतुकाची बाब म्हणजे देशात गिव्ह ईट अप योजना लागू करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार आहे.
हेही वाचा – ‘पार्थ पवारांनी मावळमधून निवडणूक लढवावी, ते जिंकतील’; आमदार अण्णा बनसोडे यांचं विधान
गिव्ह ईट अप रक्कम परत कशी केली जाणार?
भविष्यात महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वीत होणाऱ्या सर्व योजनांकरीता Give It Up Subsidy पर्यायाचे बटण उपलब्ध असणार आहे. संबंधित योजनांसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्जदाराने Give It Up Subsidy बटण/पर्याय निवड केल्यानंतर प्रस्तूत पर्याय निवडीबाबतच्या खात्रीकरीता pop-up window मध्ये सूचना येईल. सदर सूचना मान्य केल्यानंतर अर्जदारास मोबाईलवर OTP प्राप्त झालेला नमूद केल्यास Give It Up Subsidy ची प्रक्रिया पूर्ण होईल.