TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

परांजपे बिल्डरकडून २५८ जणांची फसवणूक

इमारत न बांधता उचलले गृहकर्जाचे हफ्ते ; ९ एप्रिल पर्यंतचा अल्टिमेटम

पुणे : पुण्यातील नामांकित परांजपे बिल्डरच्या वतीने सुमारे २५८ जणांची फसवणूक केली असून यामुळे नऱ्हे येथील अभिरुची परिसरातील अनेक सदनिकाधारक हवालदिल झाले आहेत. म्हाडाने सन २०१९ साली सोडत करताना धायरी सर्वे नंबर २४/१ व २५ मधील परांजपे अभिरुची परिसर येथे ४३० जणांना सदनिका मंजूर झाल्या होत्या. यात ११ मजल्यांच्या एम १,२ व ३ अशा तीन इमारतींना महरेराने सन २०१९ साली मंजुरी दिली होती.

यातील दोन इमारती पूर्ण झाल्या असून त्यातील दोन सुमारे १७२ जणांना ताबा देण्यात आला आहे. मात्र, सदर भाग हा एनडीएच्या जवळ असल्याने संरक्षण विभागाने २० जुलै २०२० साली पाचव्या मजल्यापर्यंतच परवानगी दिली व वरील मजल्याचे बांधकाम करण्याची परवानगी नाकारण्यात आली.

ही परवानगी सन २०२० मध्ये परवानगी नाकारल्यानंतर देखील बिल्डरने ११ मजल्यांच्या नकाशाप्रमाणे सन २०२१ मध्ये सदनिकांची विक्री केली. यात एचडीएफसी बँकेने मोठ्या प्रमाणात कर्जाची रक्कम बिल्डरला दिली. यामुळे अस्तित्वातच नसलेल्या इमारतीवर देखील कर्जाचे वितरण करण्यात आले.

बँकेने वितरित केलेल्या कर्जाचे हफ्ते देखील सुरू झाले असल्याने सदनिका घेतलेले दुहेरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांनी या संदर्भात सदनिकांचा ताबा मिळालेल्या व अपूर्ण असलेल्या सर्वच सदनिकाधारकांची बैठक घेतली. या बैठकीसाठी सुमारे १०० पेक्षा अधिक सदनिकाधारक उपस्थित होते.

९ एप्रिल पर्यंतचा ‘अल्टिमेटम’

सदनिका धारकांनी सन २०२० मध्ये या संदर्भांत सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये बिल्डर विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावेळी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा तक्रार करण्यात आली असून त्यासोबत ५० पेक्षा अधिक सह्या असलेले पत्र देखील जोडण्यात आले आहे. यावेळी ९ एप्रिल पूर्वी बिल्डरने या सदनिकाधारकांशी संपर्क करून संवाद साधत त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, असा अल्टिमेटम भूपेंद्र मोरे यांच्या वतीने देण्यात आला आहे.

घर हे प्रत्येकाचे स्वप्न असून त्याच स्वप्नांना धुळीस मिळविण्याचे काम येथील बिल्डर करत आहे. मात्र, बिल्डरने तातडीने या सदनिका धारकांशी संवाद साधावा अन्यथा आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. निर्धारित वेळेत काम न केल्यास अभिरुची परिसरातील बिल्डरच्या कार्यलायाला टाळे लावण्यात येईल.

  • भूपेंद्र मुरलीधर मोरे, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

माझ्याकडून सदनिकेच्या किमतीच्या ८० टक्के रक्कम भरून घेतली आहे. मात्र मला मंजूर झालेल्या इमारतीची एकही वीट अजून बिल्डरने लावलेली नाही. एका बाजूला घराचे हफ्ते सुरु झालेत, त्यामुळे आमच्यावर हवालदिल होण्याची वेळे आली आहे : पवन फुरंगे, सदनिका मंजूर झालेला रहिवासी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button