Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अखेर बच्चू कडूंचं ७ दिवसांनंतर अन्नत्याग आंदोलन मागे

Bachu Kadu : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजा सातवा दिवस आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यांनी विविध ठिकाणी उग्र निदर्शने आणि आंदोलनाचा बार उडवून दिला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात आंदोलनकर्त्यांचे उग्र रुप दिसून आले. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाणी पिऊन कडू यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सामंत यांनी १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे. यासोबतच, दिव्यांगांच्या मानधन वाढीच्या मागणीसाठी ३० जून रोजी विशेष बैठक घेण्याचे आणि यासंदर्भात अधिकृत पत्र देण्याचे आश्वासन दिले आहे. कडू यांच्या नेतृत्वाखालीली अन्नत्याग आंदोनाने सरकारला झुकवले असून ५१ उपोषमकर्त्यांपैकी एकाची तब्येत बिघडल्याने आंदोलन मागे घेण्याच विनंती राज्य सरकारने केली. सामंत यांनी पत्रातील सर्व मागण्या लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे.

हेही वाचा –  ‘हा शत्रू राष्ट्राकडून सायबर हल्ल्याचा प्रकार’, एअर इंडिया विमान अपघातानंतर संजय राऊत यांनी व्यक्त केला संशय

सरकारच्यावतीने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी बच्चू कडू यांनी भेटली होती. या भेटीत सरकारने त्यांच्या मागण्यांची गंभीरतेनं दखल घेतली असून मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय पटलावर येईल, असे म्हटले होते. त्यानंतर, आज मंत्री उदय सामंत यांनी लेखी पत्र दिल्यानंतर बच्चू कडूंनी आपलं उपोषण सोडलं आहे.

सामंत यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं असून बच्चू कडू यांच्याकडून सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास २ ऑक्टोबरनंतर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उद्या १५ जून रोजी राज्यभरात करण्यात येणारे रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. त्यामुळे, उद्या कुणीही रास्ता रोको आंदोलन करू नये, असे आवाहनही यावेली बच्चू कडू यांनी केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button