Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शेतकरीपुत्र! एक मंत्री आपला सर्व मानसन्मान बाजूला ठेवत शेतीची कामे करताना
वाई |
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे आपल्या शेतामध्ये नुकतेच भातरोपण केले. एक मंत्री आपला सर्व मानसन्मान बाजूला ठेवत शेतीची कामे करतानाचे चित्र सध्या परिसरात कुतूहलाचा विषय झाला आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे सध्या सर्वत्र शेतीची कामे सुरू आहेत.भात, नाचणी, वरी या पावसाळी पिकांची लागवड सुरू आहे.
शिंदे हे देखील आपल्या शेतात भाताचे रोपण करण्यासाठी नुकतेच दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या गावी आले. शिंदे यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट केली. तसेच पारंपरिक पद्धतीने भाताची पेरणी पूर्ण केली आहे. शिंदे हे पूर्वीपासून कायम गावी आल्यावर शेतीची कामेही आवर्जून करत असतात. एक मंत्री आपला सर्व मानसन्मान बाजूला ठेवत शेतीची कामे करतानाचे चित्र सध्या परिसरात कुतूहलाचा विषय झाला आहे.