Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रसिद्ध वेरूळ-अजिंठा महोत्सव सलग पाचव्या वर्षी रद्द
![Famous Ellora-Ajanta Festival canceled for the fifth year in a row](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/images-1-1.jpeg)
औरंगाबाद | टीम ऑनलाइन
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू ठरलेल्या वेरूळ-अजिंठा महोत्सवास रसिकांना यंदाही मुकावे लागणार आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने पुण्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. मात्र, राज्याच्या पर्यटन राजधानीत वेरूळ महोत्सवाच्या आयोजनाबाबत बैठकही झालेली नाही. त्यातच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघात ‘अजिंठा महोत्सव’ घेण्याची घोषणा केल्याने वेरूळ महोत्सवाबाबत प्रश्नचिन्ह आहे.
१९८६ पासून वेरूळ महोत्सवाचे आयोजन केले जाते. सुरुवातीला कैलास लेणीसमोर होणारा हा महोत्सव २००२ पासून विद्यापीठातील सोनेरी महालात होतो. २००७ पर्यंत तो दरवर्षी उत्साहात झाला. त्यानंतर विविध कारणांनी महोत्सव रद्द झाला. १५ वर्षांत फक्त तीनच महोत्सव होऊ शकले आहेत.