हा अलर्ट तुम्हाला सुद्धा आलाय का? वाचा नेमकं काय आहे प्रकरण..
![Emergency Alert Testing by Ministry of Telecom](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Emergency-Alert-1-780x470.jpg)
पुणे : दूरसंचारण मंत्रालयाकडून इमर्जन्सी अलर्ट टेस्टिंग करण्यात आली. आज सकाळी १०.२० ते १०.३० दरम्यान आज असंख्य स्मार्टफोन व्हाब्रेट होऊन त्यावर एक संदेश आला. त्यामुळे हा काय प्रकार आहे? असा सर्वांना प्रश्न पडला आहे. अनेकांनी समाजमाध्यमांत पोस्ट करत हा काय प्रकार आहे असं विचारलं आहे. दरम्यान, ही केंद्रीय तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही तातडीची चाचणी केली जात असल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम आहे. आपत्ती आलेल्या भागात अश्याप्रकारे DOT कडुन मोबाईलवर अलर्ट दिले जाते कि आपत्तीजनक परिस्थिती आहे. जेणेकरून सावधानता बाळगावी. एप्रिल महिन्यात टेलिकॉम रुल्स मधे सुधार करून हे फिचर सर्व मोबाईल कंपन्यांना अनिवार्य करण्यात आलेले आहे.
हेही वाचा – Asia Cup 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान सामना श्रीलंकेत खेळला जाणार
Today Morning ,
Got this notification/ Alert on my phone with a loud vibration..
What is the emergency alert?
Which Type Of Test Alert from DOT ?
any serious issues or not ?#emergencyalert pic.twitter.com/D9ovpJTVfs— AKASH PAWAR (@akash_0official) July 20, 2023
महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे म्हणाले की, अतिवृष्टीचा इशारा देण्यासाठी हा पॉपअप तयार करण्यात आला आहे. सर्व टेलिकॉम कंपनीतर्फे हा मेसेज करण्यात येतो आहे. काळजी करण्याचे किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही. असे स्पष्टीकरण दिले आहे. नागरिकांना अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थिती याची पूर्वकल्पना देण्यासाठी ही चाचणी करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.