डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची टेबल टेनिस संघाकडून भव्य विजयी कामगिरी!
शिक्षण विश्व: ‘सिल्हुएट २०२५’ स्पर्धेत AFMC, पुणे येथे विजेतेपदाची कमाई

पुणे : डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेबल टेनिस संघाने “चॅम्पियन्स ऑफ द सिल्हूट २०२५” टेबल टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट ठरला आहे.
डी .वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग टेबल टेनिस संघामध्ये प्रणव पाटील, राज कोठारी आणि अमन शर्मा यांचा समावेश आहे. या संघाने सशस्त्र दल, वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे आयोजित टेबल टेनिस स्पर्धेमध्ये डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग संघाचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये “चॅम्पियन्स ऑफ द सिल्हूट २०२५” ट्रॉफी संघाने मिळवली.
याबद्दल विद्यालयाने संघाचे अभिनंदन करत विजेत्या खेळाडूंना डी वाय पाटील आकुर्डी संकुलाचे चेअरमन सतेज पाटील, डॉ. डी वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील, डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलनाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम (निवृत्त) महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पी. मालती, प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. संदीप सरनोबत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.