breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावती विभागात दुबार पेरणीचे सावट

अमरावती |

अमरावती विभागात आतापर्यंत सरासरीच्या ११६ टक्के पावसाची नोंद झालेली असली, तरी अनियमित आणि विखुरलेला पाऊस, दोन आठवडय़ांपासून पावसाने दिलेला खंड यामुळे विभागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला काही भागात चांगला पाऊस झाला. शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पहिल्याच आठवडय़ात बरसला. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करत सुरुवात केली. मात्र नंतरच्या काळात पावसाने पाठ फिरवली. अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्य़ातील पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. पावसाने दीर्घ मुदतीचा खंड दिल्याने अमरावती जिल्ह्य़ातील ३९ टक्के क्षेत्र पेरणीअभावी कोरडे आहे. पेरणी झालेल्या ६९ टक्के क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्रात पेरणी उलटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्य़ात ८ लाख ३ हजार ७८४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणी करताना काही नियम आहेत. ३० जूनपूर्वी कपाशीची लागवड करायची असते, तर १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. पेरणीचा कालावधी जितका लांबेल तितके उत्पादन घटते. यामुळे  शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे शेतशिवारात पेरले आहे. त्यातील काही बियाणे उगवले तर काही बियाणे दडपले आहे. दिवसाचे तापमान ३८ ते ४० अंशाच्या जवळ पोहोचत आहे. या कडक उन्हात कोवळे अंकुरलेले बीज टिकणार नाही अशी परिस्थिती आहे. वातावरण असेच राहिले तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.

बुलढाणा जिल्ह्य़ात अद्यापही ३४ टक्के पेरण्या बाकी आहेत. जिल्ह्यात काही भागात तुलनेने कमी पाऊस असल्याने ही स्थिती उद्भवली आहे. जिल्ह्य़ातील ७ लाख ३४ हजार  हेक्टरवर पेरणीचे नियोजन असून त्यापैकी ४ लाख ८७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये २ लाख ७२ हजार  हेक्टरवर तेलबिया, ८९ हजार ९१२ हेक्टरवर अन्नधान्य, १३ हजार ४२१ हेक्टरवर तृणधान्याची पेरणी झालेली आहे. प्रामुख्याने सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. यासोबत कापसाचा पेरा हा आतापर्यंत १ लाख ३१ हजार १७५ हेक्टरवर झालेला आहे.

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत के वळ २९.१४ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. पावसाअभावी उडीद, मुगाचा हंगाम गेल्याने अनेक शेतकरी सोयाबीनची पेरणी करण्याच्या विचारात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यत केवळ ३४ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जिल्ह्य़ात सोयाबीनचे क्षेत्र २ लाख १८ हजार ८८६ हेक्टर आहे. यामध्ये ७४ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन उपलब्ध आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन पिके जगवत आहे; परंतु कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास पिके सुकून दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. वाशीम जिल्ह्य़ात शंभर टक्के पेरणी आटोपली आहे.

  • आतापर्यंत झालेला पाऊस

बुलढाणा: १०७ टक्के

अकोला : ५५ टक्के

वाशीम : ११६ टक्के

अमरावती : ११२ टक्के

यवतमाळ : १४२ टक्के

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button