कोणासमोर झुकून खासदारकी नको, संभाजीराजेंचा संताप; शिवसेनेबद्दल स्पष्टच बोलले…
![कोणासमोर झुकून खासदारकी नको, संभाजीराजेंचा संताप; शिवसेनेबद्दल स्पष्टच बोलले...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/कोणासमोर-झुकून-खासदारकी-नको-संभाजीराजेंचा-संताप-शिवसेनेबद्दल-स्पष्टच-बोलले.jpg)
मुंबई : शिवसेना तुम्हाला अस्पृश्य का आहे? हा आरोप त्यांनी फेटाळून ( Sambhaji Raje Chhatrapati ) लावला. अस्पृश्य हा शब्द राजे शाहू महाराजांनी घलावला. हा शब्द चुकीचा आहे. त्यांचे आजेंडे आहेत. माझी इच्छा होती अपक्ष निवडणूक लढवायची. माझे अजेंडे वेगळे आहेत. मला कुठल्या पक्षाशी द्वेष नाही. काँग्रेसचा अजेंडा वेगळा आहे, राष्ट्रवादीचा वेगळा आहे, शिवसेनेचा वेगळा आहे. मी त्यांचा आदर करतो. लोकशाही आहे ही. पण मलाच त्यात अडाकायचं नसेल तर तुम्ही बंधन घालू शकत नाही, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
भाजपकडून राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा तिसरा उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. याबाब आपली कोणाशीही चर्चा झाली नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. माझ्यासाठी खासदारकी महत्त्वाची नाही. त्यांनी दिलीच होती. पण माझ्यासाठी माझी जनता महत्त्वाची आहे. माझा विचार महत्त्वाचा आहे. स्वाभिमानाने जगणारा संभाजी छत्रपती आहे. कोणासमोर झुकून मी खासदारकी घेणार नाही. म्हणून मावळ्यांना संघटीत करण्यासाठी स्वराज्य सज्ज, असा इशारा संभाजीराजे छत्रपतींनी दिला.
‘मला फोन आले, आमदारांवर पक्षांचा दबाव’
आझाद मैदानातील आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलनावेळी मी भूमिका मांडली. किंवा रायगड किल्ल्याचं काम असेल, यावेळी मी कुठला पक्ष बघितला नाही. फक्त समाजाच्या हितासाठी भूमिका घेतली. याचा आदर कुणी करायला नको का? माझ्या या कार्यपद्धतीचा आदर करायला नको या सगळ्या पुढारी लोकांनी? आयुष्यभर मी फक्त समाजासाठी लढलो. खासदारकी कोणासाठी केली मी? आणि हे लक्षात ठेवून सर्व पक्षांनी मला राज्यसभेसाठी मदत करावी ही माझी भूमिका होती, असं त्यांनी सांगितलं. सगळ्या पक्षांच्या आमदारांवर दबाव होता. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं अनेक आमदारांनी फोन करून सांगितलं. पण दबाव आमच्यावर आहे. असं आमदार म्हणाले, असा गौप्यस्फोट संभाजीराजे छत्रपतींनी केला. अनेक आमदारांनी अनुमोदन दिलं. त्यांच्या सह्या आहेत. नावं उघड करू नये, अशी त्या आमदारांची इच्छा आहे. ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यासाठी मी ठामपणे मागे उभ राहणार आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
‘संजय राऊत हे मोठे व्यक्तिमत्व’
संजय राऊत हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. मी त्यांच्याशी का बोलू. ते एवढे मोठे नेते आहेत, मी त्यांच्याशी का बोलू. मला त्यांच्याशी बोलायची गरज नाही. मला बोलायचं असेल ना तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी मी बोलेन. त्यांनी दिलेला शब्द होता. उद्धव ठाकरे उद्या काही बोलले तर त्यावेळी मी प्रतिक्रिया देईन. संजय राऊत हे दिल्लीचे माझे खास मित्र आहेत. मी काही बोलणार नाही, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा
राज्यसभा नाही संपूर्ण राज्य? यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मी स्वराज्यासाठी सज्ज आहे. उद्यापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. स्वराज्य संघटना बळकट करणार आहे. दोन वर्षे शिवराज्याभिषेक सोहळा करोना संसर्गामुळे होऊ शकला नाही. आता येत्या ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. सर्व शिवभक्तांनी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी सोहळ्याला यावं, असं आवाहन संभाजीराजे छत्रपतींनी यावेळी केलं.