जिल्हा सत्र न्यायाधिश रचना तेहरा यांच्या कारला अपघात
वाशिम |वाशिम येथील जिल्हा सत्र न्यायाधीश रचना तेहरा यांच्या गाडीला काल रात्री १० च्या सुमारास वाशिम पूसद रोडवरील जागमाथा वळणावर अपघात झाला. या अपघातात न्याय.रचना तेहरा यांच्यासह चालक किरकोळ जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना वाशिम येथील श्रीकृष्ण हॉस्पीटल येथे भरती करण्यात आले आहे.
चालकाचा अंदाज चुकल्याने अपघात…
मंगरूळपीरहून वाशिमच्या दिशेने येत असताना जागमाथा येथील वळण मार्गावर चालकाचा अंदाज चुकल्याने त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी क्र. एम.एच.२६ ए.के ७४८८ ही रस्त्याच्या कडेला १० फुट खोल जावून खांबाला धडकली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना बाहेर काढुन पुढील उपचारार्थ वाशिम येथे रवाना केले.
दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसविण्याची प्रवाशांची मागणी…
वाशिम-पुसद मार्गावरील जागमाथा वळणावर असलेल्या खांबावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून रात्रीच्या वेळी वळणावर रिफ्लेक्टर नसल्याने बहुतांश नवीन चालकाला पुढे वळण आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे या वळणावर रिफ्लेक्टर व दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसविण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.