Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तारखा ठरल्या, शाही स्नान कधी होणार?

Nashik Kumbhmela Dates | नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहण होणार आहे. हा भव्य धार्मिक सोहळा तब्बल 18 महिने म्हणजेच 31 ऑक्टोबर ते जुलै दरम्यान नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

कुंभमेळा अधिक दीर्घकालीन आणि नियोजित स्वरूपात पार पडणार आहे. यामध्ये 3 मुख्य शाही स्नान आणि 42 पर्व स्नान समाविष्ट असणार आहेत. शाही स्नान जुलै ते सप्टेंबर दरम्यान दीड महिन्याच्या कालावधीत पार पडणार आहेत. 29 जुलै 2027 रोजी नगर प्रदक्षिणा होईल. तर पहिले अमृतस्नान हे सोमवारी, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. तर या महाकुंभातील दुसरं अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. तर तिसरं आणि शेवटचं अमृतस्नान हे 11 सप्टेंबर 2027 रोजी नाशिक येथे होईल.

हेही वाचा  :    ‘अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे’; संजय राऊतांची मागणी

कुंभमेळा नियोजन संदर्भात होणाऱ्या बैठकीत कुंभमेळा मध्ये होणाऱ्या अमृत्स्नान तारखा जाहीर

त्रंबकेश्वर अमृतस्नान तारीख जाहीर

ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृतस्नान -2-08-2027
द्वितीय अमृतस्नान – 31-08- 2027
तृतीय अमृतस्नान – 12- 09-2027

नाशिक कुंभ अमृतस्नान तारीख

31-10-2026 ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृतस्नान -2-08-2027
द्वितीय अमृतस्नान – 31-08- 2027
तृतीय अमृतस्नान – 11- 09-2027

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button