TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

दहिसर आग दुर्घटना; इमारतीतील व्हेंटिलेशन आउटलेट बंद

आगीपेक्षा धूर ठरला घातक! एका महिलेचा गुदमरून मृत्यू

मुंबई : दहिसरच्या न्यू जनकल्याण सोसायटीच्या २३ मजली एसआरए हायराइज इमारतीत रविवारी दुपारी लागलेल्या आगीत धुरामुळे एका वृद्ध महिलेचा गुदमरून मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. व्हेंटिलेशन आउटलेट बंद असल्याने धूर बाहेर निघू शकला नाही. हा धूरच रहिवाशांसाठी जीवघेणा ठरला.

महापालिकेच्या अग्निशमन दलाला दुपारी ३.०५ वाजता घटनेची माहिती मिळाली. पथके घटनास्थळी दाखल झाली असता, इमारतीच्या बेसमेंटमधील मीटर केबिन आणि इलेक्ट्रिक डक्टमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले. डक्टमधून आग आणि धूर वरच्या दिशेने पसरत गेला. मोठ्या प्रमाणावर वायर जळल्याने काळ्याकुट्ट, विषारी धुराने संपूर्ण इमारत वेढली. या आगीत एकूण ५४ जण बाधित झाले. अग्निशमन दलाने शौर्य दाखवत ३६ रहिवाशांची सुटका केली. यापैकी १९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ८० वर्षीय एका महिलेचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. आणखी दोन वयोवृद्धांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

आगीपेक्षा धूर अधिक घातक ठरल्याचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी डॉ. दीपक घोष यांनी सांगितले. रहिवासी जिन्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र धुरामुळे श्वास घेणे कठीण झाल्याने गोंधळ उडाला. मृत महिला वरच्या मजल्यावर धावताना धुराने गुदमरली. इमारतीमधील धूर बाहेर पडण्यास वाव नसल्याने धुरामुळे रहिवाशांची कोंडी झाली.

यंत्रणा बंद अवस्थेत
इमारतीत बसवलेली अग्निरोधक यंत्रणा बंद अवस्थेत होती. धूर बाहेर निघावा म्हणून ठेवलेली हवेची खेळती जागा प्लॅस्टिकने बंद करण्यात आली होती. परिणामी धूर इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर आणि घरात शिरला.

प्रशासनाला धडा
दहिसरच्या या दुर्घटनेतून स्पष्ट होते, की हायराइज इमारतींमध्ये केवळ अग्निशमन यंत्रणा बसवून उपयोग नाही, तर त्यांची कार्यवाही, देखभाल आणि योग्य वापरावर भर देणे अत्यावश्यक आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

अग्निरोधक यंत्रणा बसवणे पुरेसे नाही, ती कार्यरत ठेवणे अत्यावश्यक आहे. तसेच रहिवाशांना प्रशिक्षण देणे, व्हेंटिलेशन खुला ठेवणे आणि नियमित तपासणी करणेही तितकेच गरजेचे आहे.

– डॉ. दीपक घोष, उपमुख्य अग्निशमन अधिकारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button