breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: होम क्वारंटाइनचा आदेश झुगारुन स्थलांतर करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ज्यांना होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी या आदेशाचे पालन न करता स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्य शाससाने महसूल व पोलीस यंत्रणेला दिले आहेत.

मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, नागपूर महानगर प्रदेश येथील होम क्वारंटाईनचे आदेश असलेल्या व्यक्तींना तेथेच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. महसूल व पोलिस यंत्रणेतील अधिकारी घरोघरी जाऊन अशा व्यक्तींची तपासणी करतील. संबंधीत व्यक्ती घरात आढळली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्यात येणार आहे.

भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात अशा प्रकारच्या चाचणी केंद्रास उद्याच मान्यता मिळणार आहे. त्यामुळे या तीनही तपासणी केंद्रातून दररोज सहाशे नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार आहे. सध्या नागपूर येथे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशा चाचणीसाठी केवळ एकच केंद्र उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button