Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: रायगड जिल्ह्यात कोरोनाचे २८ नवे रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/11726-2.jpg)
रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात करोनाचे नवे २८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५४६ वर पोहोचली आहे. यामध्ये आत्तापर्यंत १८१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३४५ जण उपचार घेत आहेत. आजच्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात १२, पनवेल ग्रामीण क्षेत्रात ७, माणगावात ५, अलिबागमध्ये १, कर्जतमध्ये १ तर करंजा गावात दिवसभरात २ रुग्ण आढळून आले. त्यामुळे करंजातील एकूण रुग्ण संख्या ११९ वर पोहोचली आहे.