breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: राज्यात ७४ पोलिसांना संसर्ग
करोनाची लागण झालेल्या अधिकारी, अंमलदारांचा आकडा ७४ वर पोहोचला. त्यात १२ अधिकारी, ६२ अंमलदारांचा समावेश आहे. आतापर्यंत तीन आधिकारी आणि तीन अंमलदार बरे झाल्याची माहिती राज्य पोलीस मुख्यालयातून देण्यात आली. एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार लागण झालेल्यांपैकी सर्वाधिक पोलीस मुंबई दलातले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या किमान दीडशे पोलिसांना गृह विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.