Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: रत्नागिरीत २२५ जणांची कोरोनावर यशस्वी मात
जिल्ह्यात करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. करोनाचे रुग्ण सापडण्यापेक्षा करोनावर मात करण्याचे प्रमाण अधिक आहे. बुधवारी सायंकाळपासून २ जण करोनाबाधित सापडले असून याच कालावधीत १४ जण बरे झाले आहेत. जिल्ह्यात उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी आता ६५.५९ टक्के झाली आहे.
गुरुवारी एकूण ३४ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या २२५ झाली आहे. यामुळे उपचारांसाठी दाखल रुग्णांची संख्या ११३ पर्यंत घटली आहे. गुरूवारी समाजकल्याण येथून १५, साडवली १०, वेळणेश्वर १, सावर्डा २, गुहागर २, कामथे २ आणि दापोली येथील १ असे ३४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून संगमेश्वर तालुक्यात २ करोनाबाधित रूग्ण नव्याने आढळून आले आहेत.





