breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: यवतमाळमध्ये आढळले नवे ८ रुग्ण
यवतमाळमधील रहिवासी असलेले ८ जणांचे करोना चाचणीचे अहवाल नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)च्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी आणण्यात आले. या सर्वांची चाचणी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नागपूरमध्ये मेयो आणि एम्स या दोन प्रयोगशाळांकडे विदर्भातील जिल्हे वाटून देण्यात आले आहेत. यांपैकी एम्समध्ये अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.