Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: महाराष्ट्रात १७ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या २२०

महाराष्ट्रात ३९ करोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर नवे १७ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या २२० वर पोहचली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नव्या रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईतले, ५ पुण्याचे तर नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. ७८ वर्षीय रुग्णाचा मुंबईत तर ५२ वर्षीय रुग्णाचा पुण्यात मृत्यू झाला असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय करोनाग्रस्त रुग्णांचा तपशील

मुंबई -९२
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा -२३
पुणे (शहर आणि ग्रामीण)-४३
सांगली-२५
नागपूर-१६
यवतमाळ-४
अहमदनगर-५
सातारा-२
कोल्हापूर-२
औरंगाबाद-१
रत्नागिरी-१
सिंधुदुर्ग-१
गोंदिया-१
जळगाव-१
बुलढाणा-१
नाशिक-१
एकूण २२०

याशिवाय मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त नसल्याने त्यांचा अंतर्भाव आजच्या अहवालात करण्यात आलेला नाही. राज्यात आज एकूण ३२८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४५३८ जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २२० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ हजार १६१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १२२४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button