breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.42 टक्के
![# Covid-19: Worrying! The possibility of a third wave of corona in August-September](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Rajesh-Tope-3.jpg)
राज्यात काल दिवसभरात 3 हजार 661 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 77 हजार 453 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.42 टक्क्यांवर पोहोचलेलं आहे. सध्या राज्यात 63 हजार 342 रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.