breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: बुलडाण्यात दोन नवे कोरोना रुग्ण, आठ जणांना डिस्चार्ज

अकोला : बुलडाणा जिल्ह्यामध्ये आणखी दोन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ९२ झाली आहे. दरम्यान, आठ जणांनी करोनावर मात केल्याने आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २८ नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यातील २६ अहवाल नकारात्मक, तर दोन अहवाल सकारात्मक आले आहेत. सकारात्मक आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शेगाव येथील ३० वर्षीय पुरुष आणि बुलडाणा येथील ३६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान, आज बुलडाणा कोविड केअर सेंटरमधून मलकापूर येथील पाच, मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील दोन आणि साखरखेर्डा येथील एका रुग्णाने करोनावर मात केल्याने एकूण आठ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यामध्ये चार महिला, एक मुलगी आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ६४ करोनाबाधित रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात २५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आणखी ५१ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १५६८ अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर.जी. पुरी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button