breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: बलात्कार, आर्थिक घोटाळा आरोपींची सुटका होणार नाही; अनिल देशमुख यांची माहिती
!['That' farmer's wife lodged a complaint with the police against the tehsildar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Maharashtra_Police_Seal.png)
करोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील १७ हजार कैद्यांना तात्पुरतं सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. आर्थर रोड जेलमध्ये १८५ कैद्यांना करोनाची लागण झाल्यानंतर राज्यातील इतर कारागृहांमध्ये असणाऱ्या १७ हजार कैद्यांना सोडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण यावेळी बलात्कार, मोठे आर्थिक घोटाळे केलेले गुन्हेगार, मोक्का, टाडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना सोडलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.