Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: धुळे जिल्ह्य़ाची कोरोना रूग्णसंख्या २४८
![20 people from UK come to India positive for new strain of corona virus](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/200320110619-coronavirus-animation-super-tease.jpg)
धुळे शहरासह जिल्ह्यात तीन दिवसात ५६ ची भर पडल्याने एकूण करोना रुग्णांची संख्या २४८ वर पोहचली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागात शुक्रवारी येऊन गेलेला अभियंत्याचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर नगररचना विभाग २४ तासांसाठी करण्यात आला. आतापर्यंत ११२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २५ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ७१ वर पोहचली आहे.