Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: अलगीकरण केंद्रावरून चकमकीत एक ठार
![deadbody thrown away in Hadapsar Magarpatta](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/deadbodytag_1569487301.jpg)
बीरभूम जिल्ह्य़ातील गावातील शाळेत अलगीकरण केंद्र स्थापन करण्यावरून गावकऱ्यांच्या दोन गटांत शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत एक जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पारुई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालिबपूर गावात ही चकमक उडाली, त्यामध्ये एक जण ठार झाला. तो बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकारानंतर गावात पोलीस तैनात करण्यात आले असून स्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण आहे. पोलिसांनी चकमक कोणत्या कारणावरून उडाली ते स्पष्ट केलेले नाही. तालिबपूर गावातील एका शाळेत अलगीकरण केंद्र तयार करण्यात येणार होते. गावातील काही जण या अलगीकरण केंद्राच्या बाजूने तर काही जण विरोधात होते. या दोन्ही गटांत उसळलेल्या हिंसाचारात तरुणाचा मृत्यू झाला.