breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: अमरावतीत सापडले दोन कोरोना रुग्ण
अमरावतीत आज पहाटे दोन व्यक्तींचे करोना चाचणी अहवाल सकारात्मक आले असून जिल्ह्यातील करोनाबाधित व्यक्तींची संख्या चार मृत रुग्णांसह दहावर गेली आहे. पाटिपुरा परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेचा घरी मृत्यू झाल्यानंतर घेण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यांचे वय ९५ वर्षे होते. त्यांचे २१ एप्रिलला निधन झाले होते. त्याशिवाय, यापूर्वी निधन झालेल्या हैदरपुरा येथील एका महिलेच्या कुटुंबातील एका २२ वर्षीय युवकाचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. या युवकाला यापूर्वीच रुग्णालयात दाखल केले होते. आता त्याला कोविड कक्षात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीची तपासणी, नमुने घेणे व विलगीकरण करण्यासाठी व्यवस्था केली जात आहे.