#CoronaVirus: अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या तीनशे पार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/corona-virus-2.jpg)
अकोला शहरात करोनाची झपाट्याने वाढ होत आहे. करोनाबाधितांची संख्या तीनशे पार गेला असून शहरात बुधवारी तब्बल २९ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ३०८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २० जणांचे मृत्यू झाले आहेत. सध्या १२१ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोला शहरात करोनाच्या वाढत्या संसर्गाने अद्याप थांबण्याचे नाव घेतले नाही. शहरात कहर सुरूच असून, बुधवारी २९ नवीन रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण २४७ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २१८ अहवाल नकारात्मक, तर २९ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३०८ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील २० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपैकी एकाने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत १६७ जणांनी करोनावर मात केली. सद्यस्थितीत १२१ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, २० जण नवे करोनाबाधित आढळून आले. त्यामध्ये आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील तीन जण गीता नगर, ताजनापेठ, आश्रय नगर येथील प्रत्येकी दोन जण, रणपिसे नगर, गुलजारपुरा, न्यू खेतान नगर, आळशी प्लॉट, कच्ची खोली सिंधी कॅम्प, खोलेश्वर, गांधी रोड, भीम चौक अकोट फैल, तेलीपूरा चौक, अकोट फैल, माळीपूरा, पंचशील नगर वाशीम बायपास व नानक नगर निमवाडी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
सायंकाळच्या अहवालानुसार, आणखी नऊ करोनाबाधित रुग्ण वाढले. यामध्ये पाच महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यातील न्यू तारफैल, समता नगर येथील प्रत्येकी दोन जण, खैर मोहम्मद प्लॉट, लक्ष्मी नगर, देशमुख फैल, अडगाव ता.अकोट व पुरपीडित वसाहत अकोट फैल येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांचा युद्धस्तरावर शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. शहरात नवीन भागत आढळून आलेल्या रुग्णांचे क्षेत्र प्रतिबंधित करून घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.