Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus:जळगावच्या रुग्णालयातून 82 वर्षाची कोरोनाबाधित महिला बेपत्ता, शोध सुरु
जळगाव : भुसावळ येथील रुग्णालयातून कोरोनाग्रस्त असलेल्या 82 वर्षाच्या आजी बेपत्ता झालेल्या आहेत. आजी बेपत्ता झाल्यामुळे रुग्णालय प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आजी बेपत्ता असल्याचे रुग्णालय प्रशासनाला माहित नव्हते.
जळगाव जिल्ह्यातील नियंत्रण कक्ष वाऱ्यावर आहे, असा आरोप आता केला जात आहे. पोलिसात तक्रार दाखल केली असून आजीचा शोध सुरू आहे. पुण्यात राहणाऱ्या त्यांच्या नातवाने जळगाव रुग्णालयात फोन केल्यावर हा प्रकार लक्षात आला.