अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातील 45 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
![The number of corona victims in the state is at 32,29,547](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/1800x1200_coronavirus_1.jpg)
अमरावती – अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही झपाट्याने वाढत असतानाच आता अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातील 45 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. अमरावती विद्यापीठात मागील आठवड्यात तीन दिवस कर्मचार्यांची सामूहिक कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता त्याचा अहवाल समोर आला आहे. यात विद्यापीठातील तब्बल 45 कर्मचारी तर त्यांच्या कुटुंबातील 14 सदस्यांनाही असे एकूण 59 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल आहे.
वाचा :-नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने, शाळा राहणार 15 मार्चपर्यंत बंद
मागील आठवड्यात झालेल्या कोरोना चाचणीत विद्यापीठातील एकंदरीत 289 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. विद्यापीठात 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान 289 कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या नमुन्यांची तपासणी झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील पूजा इंगळे निकिता लोणारे यांनी नमुने घेतले होते. विद्यापीठातील प्रयोगशाळेने 59 पॉझिटिव्ह अहवालावर शिक्कामोर्तब केला आहे.
विद्यापीठातील 245 कर्मचारी-अधिकारी अजूनही कोरोना चाचणीपासून अद्यापही वंचित आहे. पुन्हा याच आठवड्यात वैद्यकीय अधिकारी स्मिता थोरात यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाच्या रूग्णालयात कर्मचार्यांची सामूहिक कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी पासून वंचित कर्मचाऱ्यांनी शिबिरात तपासणी करून घ्यावी असे आवाहन कुलसचिव तुषार देशमुख यांनी केले आहे.