महात्मा गांधी अवमान : कालिचरण महाराज याच्यावर गुन्हा दाखल होणार!
![महात्मा गांधी अवमान : कालिचरण महाराज याच्यावर गुन्हा दाखल होणार!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Image-2021-12-27-at-1.41.22-PM.jpeg)
- राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई। प्रतिनिधी
महात्मा गांधी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराज याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
बापू के लिए अपशब्दों का प्रयोग करने वाले हिंदुत्ववादी कालीचरण बाबा के विरुद्ध थाना टिकरापारा में अपराध क्रमांक 578/2021 धारा 505(2), 294 IPC के तहत अपराध दर्ज़ किया जा चुका है। https://t.co/4Rb5ZiQ2CK
— INC Chhattisgarh (@INCChhattisgarh) December 26, 2021
रायपूर येथील धर्म सांसदमध्ये बोलताना कालिचरण महाराज याने महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले आहे. याबाबत कालिचरण महाराज विरोधात टिकरापारा येथे गुन्हा दाखल केला आहे. देशभरातून कालिचरण महाराज याच्या वक्तव्याचा निषेध होत आहे.
गोडसे का महिमामंडन देश में जब से मोदी सरकार आयी तब से शुरू हो गया। अब मर्यादा लांघकर महात्मा गांधीजी को बदनाम करने का काम चल रहा है। हम मांग करते है की देशद्रोह का मुकदमा दर्ज हो और कालीचरण, जो फर्जी महाराज है उसकी गिरफ्तारी हो। pic.twitter.com/VtI4zvTDmi
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 27, 2021
दरम्यान, धर्म संसदेत सहभागी छत्तीसगढ गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष महंत राम सुंदर दास यांनी कालिचरण महाराज याच्या वक्तव्याचा निषेध करीत धर्म संसदेच्या व्यासपीठाचा त्याग केला.