अध्यात्म । भविष्यवाणीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र
ईसीएचा स्तुत्य उपक्रमः मावळ तालुक्यातील 120 जिल्हा परिषद शाळांना लॅपटॉप वाटप
![ECN, Appreciation Activities, Maval, Taluka, 120 Zilla Parishad Schools, Laptop Distribution,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Untitled-design-9-780x470.jpg)
मावळः तमाम पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना, भामा-आसखेड आणि कासरसाई धरण परिसरातील मावळ तालुक्यातील 120 जिल्हा परिषद शाळांना एन्ह्वर्मेंट कंझर्व्हेशन असोसिएशनच्यावतीने (ईसीए) लॅपटॉप वाटप करण्यात आले. पर्यावरण साक्षरते बरोबर शाळकरी विद्यार्थ्यांना ई-साक्षर करण्यासाठीचा टीम ईसीएने स्तुत्य उपक्रम राबविला. स्वच्छ भारत, प्रदूषणमुक्त भारत, जल है, तो कल है हे उद्दीष्ट असलेल्या ईसीएद्वारे विविध उपक्रम राबविले जातात.