Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात खडाजंगी

Manoj Jarange : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये सध्या नवा सामना रंगलाय. खंडोजी खोपडेंच्या भूमिकेत जाऊ नका, असं ओपन चॅलेंज भाजप आमदार राजेंद्र राऊतांनी जरांगे पाटलांना दिलं. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. राजा राऊत म्हणतात मला….  माझं डोकं फिरवू नका, अशा शब्दांत राऊतांनी जरांगेंना सुनावलंय.

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक चकमक पहायला मिळतेय…खंडोजी खोपडेच्या भूमिकेत याल तर, याद राखा, मला राजा राऊत म्हणतात…असा इशारा राऊतांनी जरांगेंना दिलाय…त्याला जरांगेंनी राऊत फडणवीसांची भाषा बोलत असल्याचा आरोप केलाय…तर तुमच्या गुंडांचे चेहरे मराठा बांधवांना पाहायचं असल्याचं आव्हान जरांगेंनी राजेंद्र राऊतांना दिलंय…तर आम्ही सर्व मराठा आमदार राजेंद्र राऊतांच्या पाठीशी असल्याचं म्हणत प्रवीण दरेकरांनी जरांगेंना प्रतिआव्हान दिलंय…

हेही वाचा   –        जयंत पाटलांच्या विधानावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये जुंपली 

राजेंद्र राऊतांच्या या आक्रमक भूमिकेनंतर जरांगे पाटलांनाही जशास तसं उत्तर दिलंय. राजेंद्र राऊत तुम्ही  फितुराच्या यादीत जाऊ नका…तुमचं चॅलेंज मी स्वीकारलं म्हणत जरांगेंनी आरपारच्या लढाईचे संकेत दिलेत.  बार्शी तालुक्यातून शेकडो मराठा कार्यकर्त्यांनी अंतरवालीत जरांगे पाटलांची भेट घेतली. जरांगेंनी त्यांच्यासोबत चर्चाही केलीय. राजेंद्र राऊतांमागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा दावा जरांगेंनी केलाय. त्यामुळे येत्या काळात या मुद्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.

माजलगावमध्ये मनोज जरांगेंनी सभा घेतली.. दरम्यान त्यांनी फडणवीसांवर सडकून टीका केलीये. तर मराठे रस्त्यावर ही फिरू देणार नाहीत असा राजेंद्र राऊतांना इशारा दिला.. जीव गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं.. एक तर ताकतीने पाडा नाहीतर ताकतीने निवडून आणा असं देखिल जरांगेंनी सभेत म्हटलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button