ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

नागरिकांची प्रशासनाकडे वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी

त्वरित पावले उचलण्याचे पालिकेचे आश्वासन

पनवेल : कळंबोली पोलाद बाजार परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब आहे. यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. येथील वाहतूक कोंडीच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली होती. यानुसार शनिवारी (ता. २७) पनवेल पालिका, वाहतूक विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांची संयुक्त समन्वय बैठक पार पडली. यासंदर्भात त्वरित पावले उचलण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे.

दररोज जड वाहतुकीमुळे कोंडी निर्माण होते. यातून सुटका होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पत्रानुसार ही बैठक आयोजित केली होती. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. नव्या विमानतळाच्या पार्श्वभूमीवर कळंबोली जंक्शनावरील पुलाच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेवर अधिकचा ताण येणार असल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांनी सिडको आणि पोलाद बाजार समितीकडे पाठपुरावा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची हमी दिली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना सुचविल्या आहेत.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

कोणत्या देशाच्या सरकारने मंत्रिमंडळात पहिला एआय मंत्री तयार केला? पोलाद बाजार व्यापारांचा केंद्रबिंदू पोलाद बाजार हा संपूर्ण नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी महत्त्वाचा व्यापारी केंद्रबिंदू आहे. येथे दररोज वाढणारी वाहतूक कोंडी नागरिक आणि वाहनचालकांसाठी मोठी समस्या बनली आहे.

यावर लवकरच ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे लवकरच कळंबोली पोलाद बाजार परिसरातील वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

नव्या विमानतळाच्या पार्श्वभूमीवर कळंबोली जंक्शनवर होणाऱ्या पुलाच्या कामामुळे, या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर अधिकचा ताण येणार आहे. यामुळे सिडको आणि लोखंड पोलाद बाजार समिती यांना सोबत घेऊन महापालिकेने रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या गाड्यांसंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असून, यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी दोन्ही संस्थांकडे पाठपुरावा करून या प्रश्नावर मार्ग काढण्याचे आश्वासित केले आहे.

– प्रशांत ठाकूर, आमदार

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button