Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री फडणवीस अखेर ‘वर्षा’ बंगल्यावर! अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त साधत केला गृहप्रवेश

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी अखेर अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी राहण्यासाठी गेलेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली.

फडणवीस यांनी गतवर्षी 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली होती. पण तेव्हापासून ते ‘सागर’ या आपल्या जुन्याच निवासस्थानी राहत होते. कारण, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर केव्हा राहण्यास जाणार? असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. अखेर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फडणवीस यांनी वर्षा बंगल्यात सपत्नीक गृहप्रवेश केला. अमृता फडणवीस यांनी एका पोस्टद्वारे या गृहप्रवेशाची माहिती दिली. तसेच काही फोटोही शेअर केले.

हेही वाचा –  “भविष्यात जातीव्यवस्था…”, जातिनिहाय जनगणनेला केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही 10 वी च्या बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे, असे अमृता फडणवीस यांनी एका पोस्टद्वारे सांगितले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच मुलीच्या दहावीच्या परीक्षेमुळे आपण अजून वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी गेलो नसल्याचे सांगितले होते. एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर आम्ही तिथे जाऊ. तिथे काही छोटी-मोठी कामेही होणार आहेत. सध्या माझी मुलगी दिविजा दहावीमध्ये शिकत आहे. ती म्हणाली की, माझी परीक्षा झाल्यानंतरच आपण तिकडे शिफ्ट होऊ. त्यामुळे आम्हालाही या प्रकरणी फार काही घाई नाही, असे ते म्हणाले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button