कर्णधार हार्दिक पंड्याचे पंतबाबतीत मोठे विधान म्हणाला, खूप खेळाडू आहेत
![Captain Hardik Pandya's big statement about Pant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/hardik-pandya-and-rishabh-pant-780x470.jpg)
पंतचा संघात समावेश असता तर, त्याने खेळाचं रुपडं पालटलं असतं
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला लवकरात लवकर बरे होण्यासाठी भारतीय संघाकडून शुभेच्छा दिल्या आहेत. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार हार्दिक पंड्यासह संघातील इतर खेळाडूंनी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी पंतला संदेश पाठवला आहे. याचा बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. कर्णधार हार्दिकने पंतबाबत महत्वाचे विधान केले आहे.
आगामी होणाऱ्या विश्वचषकासाठी ऋषभ पंत खूप महत्वाचा भाग होता. भारतीय संघाच्या प्लॅनमध्ये त्याचा सहभाग होता. पण सर्वांना आताची परिस्थिती माहित आहे. खूप खेळाडू आहेत, ज्यांना संधी मिळू शकते. पण ऋषभ पंतचा सहभाग असता, तर त्याने क्रिकेटच्या मैदानात चमकदार कामगिरी केली असती. पण आता प्रतीक्षा करूया आणि भविष्यात काय घडतंय ते पाहुया, असं भारतीय टी-20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला.
ऋष पंतचा संघात समावेश असता तर, पंतने क्रिकेट खेळाचं रुपडं पालटलं असतं..पण आता सर्वांना परिस्थिती माहित आहे. ऋषभ तु लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. मला माहित आहे की तू एक लढवय्य आहेस. गोष्टी नेहमी सारख्या नसतात. हेच आयुष्य आहे. तू प्रत्येक दरवाजा तोडून पुनरागमन करशील. तुझ्यासोबत संपूर्ण टीम आणि संपूर्ण देश आहे, असंही हार्दिक म्हणाला.
सोबतच, ऋषभ आशा आहे तू बरा आहेस. गेल्या वर्षभरात मला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. यादरम्यान तु कठीण परिस्थितीत भारतीय कसोटी इतिहासात अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. अशा परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे तुला माहीत आहे. लवकर भेटू, असं प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले.