नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोर फरार
![Builder shot dead in Nanded, attacker absconding](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Builder-shot-dead-in-Nanded-attacker-absconding.jpg)
नांदेड | नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या दोघांवर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येत होते. पण उपचारादरम्यान बियाणी यांचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार कुणी केला याचा पोलीस घटनास्थळी येऊन शोध घेतायत. आज सकाळी ११ वाजेची ही घटना घडली आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्या संजय बियाणी आणि यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या चालकाची प्रकृतीही चिंताजनक आहे. गोळीबाराच्या या घटनेने शहरात तणावाचे वातावरण आहे. संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे प्रस्थ होते. खंडणी वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, गोळीबाराची घटना cctv मध्ये टिपली गेली आहे का? याचा तपास पोलिस घेत आहेत. नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाला आहे. गोळीबाराच्या घटना आता अगदीच सामान्य होत चालल्या आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आजच्या या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात मोठी दहशत पसरलीय.