breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; तब्बल ४००० कोटीचं एमडी ड्रग्ज जप्त

पुणे | ललित पाटील ड्रग्ज प्रकरण ताजे असतानाच पुणे पोलिसांनी इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी दोन दिवसांत तब्बल ४००० कोटीचं एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत ही कारवाई केली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तीन दिवसांमध्ये ४००० कोटीचं एमडी ड्रग्ज जप्त केल्यानंतर धागेदोरे शोधण्यासाठी आणि आणखी ड्रग्जच्या मागावर देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दाखल झालेले आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पुण्यातल्या सोमवार पेठेत केवळ २ किलो ड्रग्ज सापडलं होतं. त्यानंतर १९ फेब्रुवारीला विश्रांतवाडीत १०० कोटींपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज सापडलं. यासह दौंडमध्ये ५५० किलो ड्रग्ज सापडलं आहे.

हेही वाचा     –      प्रसिद्ध मॉडेलनं संपवलं जीवन, IPLमधील प्रसिद्ध खेळाडू अडचणीत

पुणे पोलिसांना वरचेवर ड्रग्जचे साठे आणि त्याबद्दलची माहिती मिळतच गेली. २० फेब्रुवारीला करकुंभ एमआयडीसीत ११०० कोटी रुपयांचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलं. याच दिवशी म्हणजे २० फेब्रुवारी रोजीच पुणे पोलिसांनी दिल्लीत ८०० किलो ड्रग्ज जप्त केलं. बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा पुणे पोलिसांनी दिल्लीतच १२०० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे. तीन दिवसामध्ये तब्बल ४००० कोटी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button