हसन मुश्रीफांना मोठा दिलासा ! ईडीने दाखल केलेल्या ‘त्या’ गुन्ह्यात क्लीन चिट

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. मुरगूड पोलिसांनी या प्रकरणात कागल न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या रिपोर्टच्या आधारे मुश्रीफ यांची गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. दरम्यान, गुन्हा रद्द झाल्याने मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी २ वर्षांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्यावर संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये ४० कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर झाली असल्याचे आरोप केले होते.
हेही वाचा – मंत्री दादा भुसे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी; हिंदी सक्तीसंदर्भात समजूत काढण्याचा प्रयत्न
या आरोपांनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मुश्रीफ यांच्यावर अटकेचीही टांगती तलवार होती. पुढे मुश्रीफ यांनी महायुतीत प्रवेश केला आणि शिंदे सरकार, फडणवीस सरकारमध्ये त्यांना वैद्यकीय शिक्षणमंत्री पद मिळाले.