शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुधासाठी सरकार देणार ५ रुपयांचं अनुदान
![Big relief for farmers! Government will give Rs 5 subsidy for milk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/milk-producing-farmers-780x470.jpg)
मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती.
मात्र आता राज्य सरकारने ही घोषणा संपुष्ठात आणली आहे. आता दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधासाठी सरकार ५ रुपयांचं अनुदान देणार आहे. त्यामुळं पाच रुपयांच्या सबसिडीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३२ रुपयांचा दर मिळणार आहे.
हेही वाचा – ‘श्रीराम मांसाहार करायचे हे मी ओघात बोललो’; जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले होते. मात्र घोषणेनंतर याबाबतचा कोणताही आदेश अद्याप निघाला नव्हता. दरम्यान, आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.