breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत हक्काचे घर विकत घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी ः मुंबईत म्हाडाची ४ हजार घरांसाठी लॉटरी

एप्रिलअखेर सोडत, जाणून घ्या लोकेशन आणि किंमत

मुंबईः. एप्रिलमध्ये मुंबईत म्हाडाच्या घरांची सोडत निघण्याची दाट शक्यता आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेली ही लॉटरी प्रक्रिया आता सुरळीत होण्याचा अंदाज आहे. म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष मिलिंद बोरीकर यांच्या म्हणण्यानुसार, गोरेगावमध्ये म्हाडाचे दोन मोठे प्रकल्पांना या महिन्याअखेर ऑक्सूपेंसी सर्टिफिकेकट (OC Certificate) मिळणार आहे. तसंच, रहिवाशांना पजेशन देण्यासाठी इतर विभागाची मान्यतादेखील प्राप्त झाली आहे. मात्र काही विभागांकडून परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ओसी सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर गोरेगावसह अन्य विभागातील घरांची सोडतही जाहीर केली जाईल.

मुंबईत म्हाडा चार हजार घरांसाठी सोडत काढणार आहे. यात सर्व गटातील घरांचा समावेश आहे. यात सर्वाधिक घरे २, ६३८ घरांचा प्रकल्प गोरेगाव येथे आहे. त्याचबरोबर, कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली, मागाठाणेसह अन्य ठिकाणांचाही समावेश. २०१९मध्ये मुंबईत म्हाडाची सोडत निघाली होती त्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर आता ही सोडत निघणार आहे. दरम्यान, कोकण बोर्ड ४, ६६४ घरांसाठी १० मे रोजी लॉटरी जारी करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली असून आत्तापर्यंत ३३ हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे.

गोरेगावमध्ये म्हाडाचे ए आणि बी असे दोन प्रकल्प तयार होत आहेत. लिंक रोडजवळील मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या ए प्रकल्पात EWSसाठी (अत्यल्प गट) २३ माळ्यांच्या सात इमारती आहेत. यात ३२२ चौरसवर्गाची १२३९ घरे आहेत. तर, एसव्ही रोडजवळ असलेल्या ब प्रकल्पात ४-४ इमारती ईड्ब्लूएस आणि एलआयजी (अल्प गट)साठी राखीव आहेत. गोरेगावमध्ये ईडब्लूएससाठीच्या घरांच्या किमती ३५ लाख इतक्या असू शकतात. तर, एलआयजीसाठी ४५ लाख रुपयांपर्यंत किंमत असू शकते. एमआयजी आणि एचआयजीसाठीची घरे अद्याप तयार होत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button