Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फास्टॅग नियमात मोठा बदल; ‘या’ चुकीसाठी द्यावे लागतील दुप्पट पैसे, जाणून घ्या..

Fastag : महामार्गावरून गाडी चावणाऱ्या प्रत्येक वाहनचालकासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. उद्या, १५ नोव्हेंबर २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर टोल पेमेंटचे नियम पूर्णपणे बदलणार आहेत. केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी आणि टोल संकलन प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी ‘नॅशनल हायवेज फी रूल्स, २००८’ मध्ये तिसऱ्या दुरुस्तीचे अधिसूचन जारी केली आहे. हा बदल फास्टॅग सिस्टमला आणखी मजबूत करेल.

जर तुमच्या वाहनावर वैध फास्टॅग नसेल किंवा तो तांत्रिकदृष्ट्या काम करणार नसेल, तर तुम्हाला टोल प्लाझावर दंड भरावा लागेल. यापुढे रोख रक्कम देणाऱ्यांना सामान्य टोलच्या दुप्पट पैसे द्यावे लागतील, ज्यामुळे तुमचा खिसा रिकामा होईल. मात्र, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी UPI द्वारे पेमेंट केल्यास फक्त २५% जास्त भरावे लागतील. हा नियम फास्टॅग फेल झाल्यास किंवा नसल्यास लागू होईल आणि टोल प्लाझावरील गर्दी कमी करून प्रवास सोपा करण्याचा हेतू आहे.

हेही वाचा –  “बिहारमध्ये चांगलं यश मिळालं आहे, २०१० चा रेकॉर्ड..”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फास्टॅगद्वारे पेमेंट : सामान्य दराने (पूर्ण रक्कम) कापली जाईल – सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय.

UPI/डिजिल पेमेंट : फास्टॅग फेल असल्यास १.२५ पट रक्कम – रोखपेक्षा कमी खर्च, पण फास्टॅगपेक्षा जास्त.

रोख पैसे : फास्टॅग फेल असल्यास दुप्पट रक्कम – हा पर्याय टाळण्याचा सल्ला दिला जातोय.

या बदलामुळे रस्त्यावरील प्रवास अधिक डिजिटल आणि पारदर्शक होईल, तसेच टोल प्लाझावरील विलंब कमी होईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, हा नियम डिजिटल इंडियाच्या ध्येयाशी जुळणारा आहे आणि टोल संकलनात भ्रष्टाचार रोखण्यास मदत करेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button