Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बदलापूर घटनेनंतर गृह व शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा! सर्व पूर्व प्राथमिक शाळा…

नागपूर : राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक शाळा शासनाच्या अख्त्यारित आणणार, अशी घोषणा शनिवारी गृह व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. बदलापूर येथे गुरुवारी चार वर्षांच्या चिमुकलीवर व्हॅनचालकाकडून अत्याचारप्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी याबाबत कायद्या करण्यात येत असल्याचे सांगितले. बदलापूरसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण, गृह व परिवहन विभागाची एकत्रित बैठक घेऊन ठोस उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी नमुद केले.

गृह व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर आज नागपुरात प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. ते म्हणाले, पूर्व प्राथमिक शाळा शासनाच्या अख्त्यारित असण्याबाबत आतापर्यंत काहीही तरतूद नव्हती. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. पूर्व प्राथमिक शाळांबाबत कायदा करण्यासाठी शासनाला सूचना दिल्या आहेत. कायदा तयार करून राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक शाळा शासनाच्या अख्त्यारित आणण्यात येईल.

हेही वाचा –‘सत्य आणि न्याय जिंकले’, दोषमुक्त झाल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

एक अभ्यासगट तयार करून या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. शाळेची नियमावली कशी असावी, काय सुविधा असावी, मनुष्यबळ कशाप्रकारे कार्यरत असावे, याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. कायद्याचा हा मसुदा पूर्णपणे तयार झाल्यानंतर विधीमंडळाची मान्यता घेण्यात येईल. अशा घटनेनंतर प्रशासन आणखी गंभीर झाले असून शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि गृह विभाग यांची एकत्रित बैठक घेऊन कार्यप्रणाली मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बदलापूर येथील घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून व्हॅन जप्त करण्यात आली आहे. व्हॅनचा परवानही निलंबित करण्यात आल्याचे त्यांनी नमुद केले.

बदलापूर येथे चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघड झाला. बदलापूर पश्चिमेकडील नामांकित एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी १२.३० वाजेपर्यंत स्कूलव्हॅन मधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button