पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! लोणावळ्यातील ‘भुशी धरण’ ओव्हरफ्लो
![Bhushi dam overflow in Lonavala](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Bhushi-dam-780x470.jpg)
पुणे : लोणावळा-खंडाळा परिसरात पावसाने चांगलाच धोर धरला आहे. लोणावळ्यातील वर्षाविहाराचे पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले ‘भुशी धरण’ ओव्हरफ्लो झाले आहे. पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने इतर ठिकाणी देखील धबधबे कोसाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा-खंडाळा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे.
मागील काही दिवसांत सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. भुशी धरण पाच दिवसात ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या वर्षी भुशी धरण जून महिन्यामध्येच ओव्हर फ्लो झाले होते. कोसळत असलेल्या पावसामुळे लोणावळ्यातील निसर्ग सौंदर्य अधिकच सुंदर दिसत आहे. लोणावल्यात गेल्या २४ तासांत १५८ मिमी पाऊस झाला आहे.
हेही वाचा – ‘ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा’; राज ठाकरेंची बस अपघातावर प्रतिक्रिया
दरम्यान, भूशी धरण वाहू लागल्याने शनिवारी आणि रविवारी विक इंडसाठी लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठई एक पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी लोटण्याची शक्यता आहे.