बारामती हादरलं! सख्ख्या बहिण-भावाने एकत्रच गमावले प्राण; कॅनलमध्ये पडून मृत्यू
![बारामती हादरलं! सख्ख्या बहिण-भावाने एकत्रच गमावले प्राण, मृत्यूचं कारण वाचून मन सुन्न होईल](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/बारामती-हादरलं-सख्ख्या-बहिण-भावाने-एकत्रच-गमावले-प्राण-मृत्यूचं-कारण-वाचून.jpg)
बारामती |
सध्याच्या कलयुगात मृत्यू कसा कोणाला कवटाळेल सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार बारामतीत समोर आला आहे. इथे चिमुरड्या भाऊ-बहिणीने एकत्र प्राण गमावले आहेत. कालव्याजवळ सायकल खेळताना कॅनलमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील सोरतापवाडी इथे जुना बेबी कालव्याजवळ दोघेजण सायकल खेळत होते. यावेळी दोन सख्ख्या बहिण-भावाचा कॅनलमध्ये पडून मृत्यू झाला. जागृती दत्ता ढवळे आणि शिवराज दत्ता ढवळे असं मृत्यू झालेल्या बहिण-भावाचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने दोघांना उपचारासाठी नेलं असता दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाची पोलिसांत नोंद केली असून नेमकी मुलं पाण्यात कशी पडली याचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबियांना मात्र मोठा धक्का बसला आहे.