ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

‘निष्ठेने कर्तव्ये निभवणाऱ्या स्त्रीला संविधानात महत्त्वाचे स्थान आहे’; कामगार नेते बाबा आढाव

श्रीमती भारती शिवाजीराव जामगे यांचा एकसष्ठी कार्यक्रम : विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पुणे : उद्याचा भारत घडवायचा असेल तर त्यासाठी एकमेव साधन म्हणजे आपले संविधान. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन गोष्टीतून आपल्याला खूप शिकावे लागणार आहे. स्त्री हे अजब रसायन आहे. स्वतः च्या वाट्याला आलेले सुखदुःख बाजूला ठेवून देखील स्त्री ही आपली कर्तव्ये निष्ठेने निभावते म्हणूनच स्त्रीला आपल्या संविधानात महत्त्वाचे स्थान दिलेले आहे, असे उद्गार ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी काढले.

श्रीमती भारती शिवाजीराव जामगे यांच्या एकसष्ठी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, एअर मार्शल भूषण गोखले, आमदार रवींद्र धंगेकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रसाने, माजी आमदार मोहन जोशी, संजय नहार, वंदे मातरम् संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे, प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे माजी अध्यक्ष नितीन जामगे, समाजिक कार्यकर्ते अजय मते, उदय जगताप, महेंद्र केकाणे, किरण केकाणे, आदित्य मुंगळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : मोरया गोसावी देवस्थान ट्रस्टला कायदेशीर नोटीस

पुढे बोलताना आढाव म्हणाले, स्त्रीला स्वातंत्र्य मिळणे गरजेचे आहे. परंपरांचे जोखड अंगावर घेवून समाजात वावरणारी स्त्री ही खरोखरच शक्तीशाली असतें. पुरुषी अहंकारामुळे अनेकदा स्त्रीला संधी मिळत नव्हती, मात्र आजची स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र होत आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वंदे मातरम् संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे यांनी आपल्या मातोश्री श्रीमती भारती शिवाजीराव जामगे यांचा जीवनप्रवास उडगडून दाखविला. तसेच भारती जामगे यांच्या जीवनावरील चित्रफितीमुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. यावेळी धान्य, ग्रंथ, तसेच पुस्तकतुला करण्यात आली. या तुलेतील धान्य, पुस्तके हे अपंग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेला दान करण्यात आली.
एअर मार्शल भूषण गोखले, संजय नहार आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. तिरंगी पट्टी व भगवदगीता देवून मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन जामगे, सूत्रसंचालन प्रसाद भारदे तर आभार प्रदर्शन महेंद्र केकाणे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button