Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर होताच कोल्हापूरात राडा

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा मोठा परिणाम राज्यातील विधानसभा निवडणुकीत दिसून आला. जागा वाटपात उद्धव ठाकरे गटाने आक्रमक धोरण घेतले. काँग्रेस मोठा भाऊ असला तरी कमी जागांवर भागणार नाही, असे ठाकरे गटाचे सूत्र होते. त्यानंतर बैठकांमध्ये खडाजंगी झाली. शेवटी दिल्ली हायकमांडला पाचारण करावे लागले आणि राज्यातील जागांवर समसमान, एकसमान सूत्र असे प्रयोग सुरू झाले. तरीही काही जागांवर खटके उडत होते. शेवटी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची असल्याने सामोपचाराने घेण्यात आले. आता काँग्रेस पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये राडा झाला आहे.

काँग्रेस पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यानंतर काही नाराजांनी कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयावर दगडफेक केली. अज्ञाताकडून मध्यरात्रीच्या सुमारास हे कृत्य करण्यात आले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज गटाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस कार्यालयाच्या परिसरात अनेक ठिकाणी काळ्या अक्षरात कार्यकर्त्यांनी चव्हाण पॅटर्न लिहिले आहे. त्यांनी त्यांची नाराजी जाहीर केली आहे.

हेही वाचा –  भाजपकडून विद्यमान आमदारांनाच संधी, आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर

काँग्रेस पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर केले. तिसऱ्या यादीत गडचिरोलीपासून ते मुंबईपर्यंतचे 15 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये वांद्रे पश्चिम येथून असिफ झकेरीया, अंधेरी पश्चिम येथून सचिन सावंत, दिग्रज येथून ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.

खामगाव – राणा दिलीप कुमार सानंदा

मेळघाट -एससी – डॉ. हेमंत नंदा चिमोटे

गडचिरोली -एसटी – मनोहर तुळशीराम पोरेटी

दिग्रज – माणिकराव ठाकरे

नांदेड दक्षिण – मोहनराव मानोतराव अंबाडे

देगलुर एससी – निवृत्तीराव कोंडीबा कांबळे

मुखेड – हनमंतराव पाटील

चंदवड – शिरिषकुमार वसंतराव कोटवाल

इगतपुरी एसटी – लखीभाऊ भिखा जाधव

भिवंडी प. – दयानंद मोतीराम चोरघे

अंधेरी प.- सचिन सावंत

वांद्रे प.- असिफ झकेरिया

तुळजापूर – कुलदीप धीरज आप्पासाहेब कदम पाटील

कोल्हापूर उत्तर – राजेश भारत लाटकर

सांगली – पृथ्वीराज गुलाबराव पाटील

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button