breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्र

केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याचे दर झपाट्याने वाढले!

Onion Rate | केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवून देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान निर्यात बंदी उठवताच कांद्याचे दर झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात सोमवारी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच रविवारच्या तुलनेत आज सोमवारी बाजारसमितीत कांद्याचे दर प्रतिक्विंटल ६६१ रुपयांनी वाढले. त्यामुळे कांद्याला २ हजार १०० रुपये इतका बाजारभाव मिळत आहे.

हेही वाचा      –      निवडणूक आयोग ५ वर्ष झोपा काढतो का? राज ठाकरेंचा परखड सवाल 

सध्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ३०० वाहनातून कांद्याची आवक होत आहे. कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल २ हजार १०१ आणि कमीतकमी १ हजार रुपये इतका भाव मिळत आहे. कांद्याचा भाव सरासरी १ हजार ८०० रुपये असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button