breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात, १४ वर्षांच्या मुलाने टँकरने तिघांना उडवलं

पुणे | पुण्यातील कल्याणीनगर भागात आलिशान कारने १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने दोघा तरुणांना चिरडल्याची घटना घडली होती. ही घटना थांबत नाही यातच पुन्हा एकदा कोंढवा परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने पाण्याचा टँकर चालवित व्यायामासाठी निघालेल्या एक महिला आणि मुलीला उडविल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आज (शनिवार) सकाळी ६.३० च्या सुमारास हा अपघात घडल्याचं समजतं. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवले आहे. अतशिय अवजड टँकर अवघ्या १५ वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सैफ पठाण असे या टँकर चालकाचे नाव असून तो अवघ्या १५ वर्षांचा आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच याप्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी तो टँकरही ताब्यात घेतला आहे. या टँकरचा मूळ मालक, महिंद्रा बोराटे याला देखील पोलीस चौकशीसाठी बोलावणार आहेत.

हेही वाचा     –      ‘आमची आघाडी हाच आमचा चेहरा’; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची भूमिका 

कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी हे दुचाकीवरून जात होते. तर त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या काही मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले. अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button