जेवण वाढायला सांगितल्याचा पत्नी आणि मुलीला राग, पतीसोबत केलं भयंकर कृत्य
![Anger to wife and daughter for asking to increase food, horrible act done with husband](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Anger-to-wife-and.jpg)
परभणी | जेवण करण्यासाठी वाढ म्हणने एका पतीला चांगलेच महागात पडले आहे. पत्नीने डोक्यात काचेची बॉटल घालून आणि मुलींनी शिवीगाळ करून डोक्यात बॉटल मारून जखमी केल्याची घटना परभणी शहरातील आनंदनगर भागात घडली आहे. राजेंद्र खंदारे असे जखमी पतीचे नाव आहे.
परभणी शहरातील आनंदनगर येथील रहिवासी राजेंद्र खंदारे दारू पिल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या घरी गेले होते. त्यांनी पत्नीला जेवायला वाढ म्हणल्यानंतर राजेंद्र खंदारे हे दारू पिऊन आल्यामुळे पत्नीला राग अनावर झाला. त्यामुळे पत्नीने राजेंद्र खंदारे यांच्या डोक्यात काचेची बॉटल मारून जखमी केले. तर घरामध्ये असलेल्या मुलीने देतील वडील दारूच्या नशेमध्ये आले असल्याचे पाहून वडिलांना शिवीगाळ करून काचेची बॉटल डोक्यात मारू जखमी केले.
सदरील प्रकार घडल्यानंतर परभणी शहरातील आनंदनगर येथील रहिवासी राजेंद्र खंदारे यांनी नानलपेठ पोलीस ठाणे गाटून पत्नी व मुली विरोधात तक्रार दिली असून पत्नी व मुली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास पोलीस करत आहेत.